होमपेज › Solapur › संक्रातीपूर्वीच भाजप-राष्ट्रवादीच्या तीळगुळाचा बोलबाला

संक्रातीपूर्वीच भाजप-राष्ट्रवादीच्या तीळगुळाचा बोलबाला

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 11:05PM

बुकमार्क करा
मोहोळ : महेश माने

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. राजन पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खा. शरद बनसोडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत लोकनेते कारखान्याचे चेअरमन तथा जि.प सदस्य बाळराजे पाटील हेदेखील उपस्थित होते.

यावेळी उभय नेत्यांमध्ये विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. यावेळी खा. शरद बनसोडे यांनी माजी आ. राजन पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांचा सन्मान केला. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकर संक्रातीपूर्वीच मोहोळ राष्ट्रवादी अन सोलापुरी भाजपच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांना मात्र चर्चेचा तीळगूळ मिळाला आहे.

खा. शरद बनसोडे हे लोकसभेला विजयी झाल्यापासूनच त्यांनी मोहोळ तालुक्यातील विकासकामांसाठी निधी देण्याची सकारात्मक भूमिका ठेवली आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांचा माजी आ. राजन पाटील यांच्याबरोबर असणारा स्नेह वृद्धीगंत झाला आहे. त्यामुळे खा. बनसोडेंचा अनगरकरांशी वाढलेला संपर्क पाहून तालुक्यातील राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या सदिच्छा भेटीच्यावेळी तालुक्यातील कोणते भाजप नेते उपस्थित होते. याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून या भेटीमुळे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
खा. शरद बनसोडे यांच्या लोकसभा मतदारसंघात असणार्‍या मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी पक्षभेद विसरुन हे दोन्हीही नेते गेल्या वर्षभरापासून एकमेकांशी संपर्क ठेवून आहेत. खा. बनसोडे यांनी मोहोळ तालुका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी आ. राजन पाटील यांनी सुचवलेल्या कामांना विकास निधी देवून विकासकामे करताना राजकारण करायचे नसते, असा अप्रत्यक्ष संदेश भाजपच्या पदाधिकार्‍यांना दिला होता. आतापर्यंत खा. बनसोडे यांनी अनगर भागातील गावांना पाच ते सहा वेळी भेटी दिल्या होत्या. शिवाय राष्ट्रवादीचे युवा नेते बाळराजे पाटील यांच्याकडून या भागातील विकास कामांबाबतच्या अडीअडचणी जाणून घेतल्या होत्या. 

दोन नेत्यांत दिलखुलास गप्पा
बुधवारी खा. शरद बनसोडे यांनी माजी आ. राजन पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे भेटीबाबत संपर्क साधला होता. त्याचवेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दैनंदिन कामासाठी माजी आ. राजन पाटील हे सोलापूरच्या दिशेने जात होते. यावेळी बाळराजे पाटील हे सोलापूर मध्येच होते. दुपारी या दोन्हीही नेत्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी एकमेकांशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी खा. बनसोडे यांनी बाळराजे पाटील यांच्याकडून मोहोळ रस्ते, आरोग्य व विजेच्या संदर्भातील समस्यांची व प्रलंबित विकास कामांची माहिती विस्तृतपणे जाणून घेतली. यावेळी खा. शरद बनसोडे यांनी माजी आ. राजन पाटील यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रकृतीबाबत अत्यंत आपुलकीने व आस्थेवाईकपणे चौकशी केली.