Wed, Jun 26, 2019 18:28होमपेज › Solapur › संघर्ष हीच माझ्या लेखनाची खरी प्रेरणा : नवनाथ गोरे

संघर्ष हीच माझ्या लेखनाची खरी प्रेरणा : नवनाथ गोरे

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 7:56PMपंढरपूर : प्रतिनिधी

 गावातील दुष्काळ माझ्या मनाला स्पर्श करत होता, आजही समाज अंध:श्रद्धेत अडकलेला आहे. परिस्थितीने मला शहाणे केले. शिक्षणासाठी गरिबीचे भांडवल  न करता त्यावर कष्टंांने मात केली पाहिजे.असे मत फेसाटी कार नवनाथ गोरे यांनी व्यक्त केले. 

येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी  म्हणून कर्मवीर वाचनकट्टा सुरू करण्यात आला आहे. या वाचनकट्ट्याचे उदघाटन  नवनाथ गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोकराव भोईटे अध्यक्षीय  मनोगत व्यक्त करताना म्हणाले ,  सत्य कोणालाच नाकारता येत नाही फेसाटी मध्ये वास्तविक सत्य मांडलंं आहे.चांगल्या ग्रथांच्या वाचनाने माणूस समृध्द होतो. त्यासाठी वाचन चळवळीची गरज आहे. 

यावेळी प्रा. डॉ. देवानंद सोनटक्के, ग्रंथपाल प्रा. विनया पाटील, डॉ. राजाराम राठोड, डॉ. रमेश शिंदे, प्रा. सुभाष कदम, डॉ. समाधान माने, डॉ. नितिन सोहनी उपस्थित होते.