Sat, Apr 20, 2019 08:05होमपेज › Solapur › विकासाचे केलेले काम उपकार नसून ऋण : आ. नारायण पाटील

विकासाचे केलेले काम उपकार नसून ऋण : आ. नारायण पाटील

Published On: Mar 14 2018 12:48AM | Last Updated: Mar 13 2018 9:25PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

करमाळा तालुक्याचे विकास काम करणे हे काही उपकार नसून प्रत्येक विश्‍वासाने टाकलेल्या मताचे आपण ऋण फेडत आहे, असे प्रतिपादन आमदार नारायण पाटील यांनी केले.

आ. पाटील यांनी करमाळा तालुक्यात केलेल्या विकासकामांचा आढावा मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजिली होती. पं.स. सभापती शेखर गाडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी जि.प. सदस्या सवितादेवी राजेभोसले, अनिरूध्द कांबळे, बिभिषण आवटे, जयप्रकाश बिले,  उपसभापती गहिनीनाथ ननवरे, सदस्य दत्तात्रय सरडे, डबल उप महाराष्ट्र केसरी अतुल पाटील, गणेश चौधरी, संतोष खाटमोडे, धुळाभाऊ कोकरे, नीलकंठ देशमुख, देवानंद बागल, महादेव पोरे, प्रा. शिवाजीराव बंडगर, अ‍ॅड. अजित विघ्ने, प्रवीण कटारिया, संजय परदेशी, समीर बावा, दराडे गुरूजी, नवनाथ झोळ, अमित निमकर, प्रा. अर्जुन सरक, सरपंच साळवे, विलास कोकणे, उदयसिंह मोरे-पाटील, बापुसाहेब पाटील, संजय चौधरी, अमित निमकर उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले की, तालुक्यात एका वर्षात 2018 च्या अर्थसंकल्पात 233 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात यश आले आहे. नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध कामांसाठी आपण निधीची मागणी केली होती. यातील तब्बल 88 कोटी रुपयांच्या कामांना निधी मंजूर झाला असून यात अनेक महत्त्वाच्या कामांना निधी मंजूर झाला आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेस 20 कोटी, तर रस्त्यांच्या कामांसाठी 188 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात पोमलवाडी पूल, बाभुळगाव ते कुंभेज, केतुर ते वाशिंबे यासह अनेक कामांचा समावेश आहे. पुनर्वसन कामांना यंदा सात कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. 

याशिवाय इतर कामांसाठी बारा कोटी रुपये मंजूर झाले असून यात जलयुक्त शिवार नऊ कोटी, जेऊर येथील नियोजित मंजूर महावितरण ट्रान्सफार्मर भवन 125 लक्ष, बाजारतळ निवारा शेड (जेऊर) 50 लक्ष, कुस्ती प्रशिक्षण केंद्र (जेऊर) मॅट खरेदी 7 लक्ष, आवाटी दर्गा 1 कोटी 39 लक्ष, क दर्जा तीर्थक्षेत्रे विकास 17 लक्ष आदी कामांना निधी मंजूर झाला असून आमच्या प्रयत्नातून तीर्थक्षेत्र ब दर्जा मिळालेल्या श्री कमलाभवानी मंदिर करमाळा व कुर्डुवाडी येथील मंजूर नियोजित ट्रोमाकेअर सेंटरसाठी निधीची मागणी केली आहे.