Sun, Aug 25, 2019 19:26होमपेज › Solapur › नाईक निंबाळकर वाड्यात मोठा इतिहास दडला आहे : संजीवराजे

नाईक निंबाळकर वाड्यात मोठा इतिहास दडला आहे : संजीवराजे

Published On: Jan 17 2018 2:05AM | Last Updated: Jan 16 2018 9:09PM

बुकमार्क करा
भाळवणी : वार्ताहर

 भाळवणीतील नाईक निंबाळकर घराण्यातील सिदोजीराव नाईक निंबाळकर यांना त्यांच्या पराक्रमाबद्दल सरलष्कर पदवी छत्रपतींनी बहाल केली. त्यानंतरच्या काळामध्ये पानिपतच्या युद्धामध्ये शत्रूशीं लढता लढता याच घराण्यातील शूर योध्दा खंडेराव नाईक -निंबाळकर यांना वीरमरण आले. त्यामुळे या नाईक निंबाळकर वाड्यामध्ये मोठा इतिहास दडलेला आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी केले.

भाळवणी (ता. पंढरपूर) येथे सरलष्कर सिदोजीराव नाईक निंबाळकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने पानिपत रणसंग्राम 14 जानेवारी 1761 शूर योध्दा खंडेराव नाईकनिंबाळकर स्मृतिदिन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर हे होते.  याप्रसंगी व्यासपीठावर सेवानिवृत्त विभागीय आयुक्‍त प्रभाकर देशमुख, डॉ. आनंदराव जाधव, प्राचार्य डॉ. कृष्णाजी इंगवले, ज्येष्ठ इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख, डॉ विकास जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी प्रभाकर देशमुख , डॉ. आनंदराव जाधव, डॉ. कृष्णाजी इंगवले, गोपाळराव देशमुख यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेंद्रसिंह निंबाळकर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, संग्रामसिंह जहागिरदार, हेमंतराव नाईकनिंबाळकर, नंदकुमार पवार, महेंद्र नाईकनिंबाळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धनंजय धोत्रे व प्रशांत माळवदे यांनी केले. आभार धैर्यशील नाईकनिंबाळकर यांनी मानले.