Fri, Apr 26, 2019 17:51होमपेज › Solapur › नागनाथ क्षीरसागर भाजप सोडण्याच्या वाटेवर

नागनाथ क्षीरसागर भाजप सोडण्याच्या वाटेवर

Published On: Feb 21 2018 1:19AM | Last Updated: Feb 21 2018 1:19AMसोलापूर : प्रतिनिधी 

आगामी मोहोळ विधानसभा निवडणुकीसाठी आपण पुन्हा इच्छुक असून यावेळी राष्ट्रवादीकडून लढण्याचा आपला मनोदय असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा मोहोळचे भाजप नेते नागनाथभाऊ क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

मोहोळ तालुक्यात पूर्वीपासून आपले काम असून सर्वसामान्य लोकांसाठी आपण कार्यरत आहोत. मोहोळ विधानसभा निवडणुकीत गतवेळी आपण शिवसेनेकडून इच्छुक होतो. मात्र उमेदवारी मिळाली नाही, तर दुसरीकडे भाऊ संजय क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाल्याने आपण माघार घेतली होती. मात्र येत्या निवडणुकीसाठी आता स्थानिक उमेदवार म्हणून आपली बाजू भक्‍कम आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत येणारी विधानसभा निवडणूक आपण लढणार असून यावेळी पक्ष मात्र निश्‍चित बदलणार असल्याचे संकेत क्षीरसागर यांनी दिले आहेत. राष्ट्रवादीची उमेदवारी आपल्याला मिळेल अशी अपेक्षा असून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांबरोबरही आपली चर्चा झाली असल्याचे नागनाथ क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले आहे. नागनाथ क्षीरसागर हे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी  अबू कुरेशी यांचा दरोडेखोरांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ते जिल्हाधिकार्‍यांना भेटण्यासाठी आले होते.  यावेळी बार्शीचे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तालुक्यात आपला जनसंपर्क दांडगा आहे.

तसेच लोकसभेला आपल्याला या मतदारसंघात जवळपास 54 हजार  मते पडली होती. त्यामुळे जर राष्ट्रवादीने आपल्याला उमेदवारी दिली तर आपण निश्‍चित या भागाचा आमदार होऊ शकतो, असा विश्‍वास नागनाथ क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्‍त केला आहे.