Wed, Nov 21, 2018 15:21होमपेज › Solapur › सोलापूर :चारित्र्याच्या संशयावरून रखेलीचा खून

सोलापूर :चारित्र्याच्या संशयावरून रखेलीचा खून

Published On: Feb 13 2018 11:38AM | Last Updated: Feb 13 2018 11:38AMसोलापूर : प्रतिनिधी

चारित्र्याच्या संशयावरून फळविक्रेत्या तरुणाने रखेलीच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करुन तिचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना शहरातील मुल्लाबाबा टेकडीवर घडली असून याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खून करणार्‍या फळविक्रेत्यास अटक केली आहे.

फिरोज उर्फ महेबूब चाँदसाब जमादार (वय ३२, रा. मुल्लाबाबा टेकडी, सिध्देश्‍वर पेठ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या फळविक्रेत्याचे नाव आहे. बिल्कीस इक्बाल शेख (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून याबाबत फैजिदार फिरोज अन्सारी (वय ३२, रा. मुल्लाबाब टेकडी, सिध्देश्‍वर पेठ, सोलापूर) या महिलेने फिर्याद दाखल केली आहे.