Thu, Apr 18, 2019 16:05होमपेज › Solapur › खांडोळी करून मृतदेह टाकला बोअरवेलमध्ये 

खांडोळी करून मृतदेह टाकला बोअरवेलमध्ये 

Published On: Aug 19 2018 3:50PM | Last Updated: Aug 19 2018 3:56PMरड्डे : वार्ताहर
मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी, जुनोनी गोणेवाडी व जुनोनी या तीन गावांच्या हद्दीवर असलेल्या मासाळ व आलदर वस्तीलगत शनिवारी (18 ऑगस्ट) रात्री एका अज्ञात इसमाचा खून करून त्याच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे करून ते बोअरवेलमध्ये टाकले होते.  

 हा खून इतका निर्दयीपणे केला असून त्याचे मुंडके धडावेगळे केले आहे. शरीराचे छिन्‍न विच्छिन्‍न तुकडे करून ते गोणेवाडी येथील शेतकरी सुभाष मासाळ यांच्या शेतात असलेल्या  बोअरवेल व विहिरीमध्ये टाकलेे. मासाळ हे सकाळी 10 च्या दरम्यान आपल्या बाजरीच्या पिकाची पहाणी करण्यास गेले असता त्या ठिकाणी काही जणाची  आपल्या शेतातील भुईमूग या पिकात झटापट झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यावेळी त्यांना संशय आला असल्याने त्यांनी शेताची पहाणी केली असता त्यांच्या शेतातील बोअरवेलजवळ रक्‍ताचे डाग असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी लागलीच हा प्रकार आसपासच्या लोकांना सांगितला. 

त्यांनी ही घटना पोलिस मंगळवेढा स्टेशनला कळवले असता यावेळी मंगळवेढा  येथील उपविभागीय  पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते, उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, शाहुराज दळवी, राजकुमार ढोबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. तपास सुरू असताना खुपसंगी येथील महिला वंदना भीमराव हातागळे ही महिला सदरच्या घटनास्थळी आली. व तिने माझा पती शनिवारी सकाळपासून बेपत्ता आहे असे पोलिस अधिकार्‍यांना सांगितले. यावेळी वंदना हातागळे यांची आई जिजाबाई भोसले व मुलगा यांना या ठिकाणच्या वस्तू दाखवल्या नंतर त्या महिलेने माझ्याच पतिचेच वस्तू असल्याचे सांगितलेे. 

उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे यांनी त्या महिलेला तत्काळ मंगळवेढा पोलिस स्टेशनला पाठवले. पुढील तपास चालू केला असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत.  रात्री उशिरापर्यंत बोअरवेल चे जे.सी.बी. च्या सहाय्याने खोदकाम सुरू होते.