Wed, Jul 24, 2019 12:05होमपेज › Solapur › खूनप्रकरणी पतीस अटक

खूनप्रकरणी पतीस अटक

Published On: Jan 06 2018 1:28AM | Last Updated: Jan 05 2018 9:27PM

बुकमार्क करा
बार्शी : तालुका प्रतिनिधी 

अनैतिक संबंधास अडसर ठरत असलेल्या नवविवाहित पत्नीचा खून करून हल्ला झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी पतीला पांगरी पोलिसांनी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयातून ताब्यात घेऊन अटक केले आहे. महेश भारत मिसाळ, (रा. खामसवाडी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. महेश यास बार्शी न्यायालयात हजर केले असता त्याला 9 जानेवारीपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

मनिषा महेश मिसाळ (वय 21, रा. खामसवाडी) या अवघ्या 8 महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या  महिलेचा खून केल्याप्रकरणी महेश याच्याविरुद्ध पांगरी पोलिसांत गुन्हा खुनाचा दाखल करण्यात आला आहे. 

आपल्याला अज्ञातांकडून मारहाण झाल्याचा व त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न  महेश याने केला होता. त्यासाठी तो उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखलही झाला होता. मात्र, खून केल्याप्रकरणी मनिषा हिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून  महेश मिसाळ याच्याविरुद्ध खून करून बनाव केल्याप्रकरणी पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.उपचारासाठी दाखल अवस्थेत पांगरी पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात महेश मिसाळ याच्यावर पाळत ठेऊन अटक केले. 

खुनामध्ये सहभाग असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.