Tue, Mar 19, 2019 05:13होमपेज › Solapur › पंचवटी खूनप्रकरणी चौघांवर खुनाचा गुन्हा

पंचवटी खूनप्रकरणी चौघांवर खुनाचा गुन्हा

Published On: May 20 2018 10:02PM | Last Updated: May 20 2018 10:02PMमाळीनगर  : वार्ताहर 

अकलूज  जवळील पंचवटी भागात घडलेल्या दुर्घटनेला जबाबदार धरून पोलिसांनी चौघांविरूध्द खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. सागर भारत पवार (रा. सरवस्ती माळीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला असून या प्रकरणी अद्यापपर्यंत कोणालाही अटक केलेली नाही.

शनिवारी दुपारी अडीच वाजता आकाश भारत पवार (वय २१, रा. माळीनगर) याचा पंचवटी येथे मृत्यू झाला आहे. पंचवटी येथील अमीर शेख, मोहसीन शेख व अन्य दोघांच्या विरोधात या प्रकरणी भादवी ३०२, ३२३, ३४, ५०४, ५०६,७(१) (ऊ) या कलमानुसार गुन्हा नोदविण्यात आला आहे. याबाबत सागर पवार यांनी तक्रार दिली आहे. आकाश हा अकलूज ग्रामपंचायतीमध्ये कामाला होता. शनिवारी दुपारी तो अकलूजकडे निघाला होता. या रस्त्यावर पंचवटी येथे त्याला अमीर शेख, मोहसीन शेख व त्यांच्या दोन सहका-यांनी मारहाण केली. यावेळी तो डोक्यावर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांच्या नातेवाईकांनी अकलूजच्या सरकारी दवाखान्यात त्याला उपचारासाठी नेले होते यावेळी त्याचे निधन झाल्याने सांगण्यात आले. 

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. ओरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांकडून सागितले जात आहे. दरम्यान आकाश पवार याच्यावर आज सवतगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंसकार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुढील तपास डि वाय एस पी मंगेश चव्हाण करीत आहेत.

Tags : murder case, charge, solapur news