Sun, Jan 19, 2020 21:47होमपेज › Solapur › सोलापूर : विहिरीत मिळाला माय-लेकाचा मृतदेह

सोलापूर : विहिरीत मिळाला माय-लेकाचा मृतदेह

Published On: Dec 18 2017 7:04PM | Last Updated: Dec 18 2017 7:04PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर-विजापूर रोडवरील हत्तुर शिवारातील भिटे वस्ती येथील विहिरीमध्ये माय-लेकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.

करिना रियाज शेख (वय २४) आणि आबुजैद रियाज शेख (वय ४ महिने, रा. भिटे वस्ती, हत्तुर) अशी मृत पावलेल्या माय-लेकाची नावे आहेत.

करिना आणि रियाज यांचा विवाह सुमारे दोन वर्षांपूर्वी झाला आहे. लग्नानंतर त्यांना मुलगा झाला असून पती रियाज हा मजुरीचे काम करतो. सोमवारी सकाळी भिटे वस्ती येथील विहिरीमध्ये करिना आणि मुलगा आबुजैद या दोघांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला. याची माहिती विजापूर नाका पोलिसांना मिळताच सहायक फौजदार पाटील यांनी दोघांचेही  मृतदेह  पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी दोघांनाही उपचारापूर्वी मृत घोषित  केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.