Sun, Jul 21, 2019 07:51होमपेज › Solapur › सोलापुरात आईसह दोन मुलांची हत्या, दोन मुली बेपत्‍ता 

सोलापुरात आईसह दोन मुलांची हत्या, दोन मुली बेपत्‍ता 

Published On: Apr 06 2018 8:14PM | Last Updated: Apr 06 2018 8:14PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर ते मंगळवेढा रोडवरील तिर्‍हे जवळील सिध्दनाथ साखर कारखान्याजवळील एका झोपडीमध्ये आई व दोन मुलांची धारदार शस्त्राने डोक्यात जबरी वार करुन हत्‍या करण्यात आली आहे. तर, याच घटनेत दोन मुली बेपत्‍ता आहेत. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. 

या घटनेमुळे तिर्‍हे परिसरामध्ये एकच  खळबळ उडाली  असून,  याबाबत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्याचे  काम उशिरापर्यंत सुरु होते. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

हनमबाई रणछोड जाधव (वय, 40), लाखी रणछोड जाधव (वय, 20) आणि मपा रणछोड जाधव (वय, 17) अशी खून करण्यात आलेल्यांची नावे असून, धुना रणछोड जाधव (वय, 18) आणि वसन रणछोड जाधव (वय, 16) या  दोन मुली बेपत्‍ता आहेत.  
 

Tags :  solapur district, tire village, mother, solapur police