Thu, Apr 25, 2019 12:22होमपेज › Solapur › मोहोळ घरफोडी प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी

मोहोळ घरफोडी प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी

Published On: Aug 14 2018 10:39PM | Last Updated: Aug 14 2018 8:51PMमोहोळ वार्ताहर:

मोहोळ शहरातील सुहास अलंकार गृह हे सराफ दुकान फोडून ७० हजार रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपींना मोहोळ न्यायालयाने १८ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सज्जन यशवंत गजघाटे, संजय उमाजी पवार (दोघे रा. रानमसले ता. उत्तर सोलापूर) अशी सदर आरोपींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सज्जन गजघाटे आणि संजय पवार यांनी अन्य चार साथीदारांच्या मदतीने मोहोळ येथील सुहास अलंकार गृह हे सर्व दुकान फोडले होते. यावेळी त्यांनी अंदाजे ७० हजार रुपयांचा सोने चांदीचा ऐवज लुटला आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वरील दोघांना अटक करून जेरबंद केले होते. मात्र त्यांच्या अन्य चार साथीदारांची नावे अद्याप निष्पन्न झाले नसून ते फरार आहेत.

मंगळवारी १४ ऑगस्ट रोजी मोहोळ पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना मोहोळ न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना १८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवून गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्यातील फरार आरोपी यांचा ठाव ठिकाणा कुठे आहे, चोरी केलेला मुद्देमाल आरोपीने कुठे ठेवला आहे, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी गाड्या कुठे आहेत. या बाबतचा तपास करण्याचे कठीण आव्हान मोहोळ पोलिसांच्या समोर आहे. 

मोहोळचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अन्वर मुजावर हे करीत आहेत. लवकरच उर्वरित आरोपींना अटक करून जेरबंद करणार असल्याचे त्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.