Thu, May 23, 2019 05:07होमपेज › Solapur › पेनूरजवळ अपघातात माय-लेक जागीच ठार

पेनूरजवळ अपघातात माय-लेक जागीच ठार

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:39PM

बुकमार्क करा

मोहोळ : प्रतिनिधी

भरधाव ट्रकने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात माय-लेक जागीच ठार झाल्याची घटना मोहोळ-पंढरपूर राज्य महामार्गावर सोमवारी सकाळी सात वाजता घडली.

प्रवीण सर्जेराव भोसले (वय 26) व अविंदा सर्जेराव भोसले (46, दोघे रा. पापरी. ता. मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर ट्रक पसार झाला.  पापरी येथील प्रवीण भोसले व त्याची आई हे दोघे खरसोळी येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी पंढरपूर रोडमार्गे मोटारसायकल (क्र.  एम एच 13 सीआर 4778) वरून चालले होते. त्यांची मोटारसायकल पेनूरजवळील दर्ग्याजवळ आली असता, समोरून येणार्‍या ट्रकने त्यांना धडक दिली. त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मालट्रक तसाच सोलापूरच्या दिशेने निघून गेला. घटनास्थळी अपघात करून पसार झालेल्या मालट्रकच्या बंपरचा प्लास्टिक तुकडा सापडला. त्यावर मालट्रकचा क्रमांक व सुभाष असे लिहिलेले होते. त्यावरून पोलिस हवालदार नागनाथ निंबाळे यांनी सावळेश्‍वर टोलनाका फुटेजवरून या मालट्रकचा फोटो मिळवला. त्यामध्ये ट्रकच्या समोरच्या बाजूचे बंपरदेखील तुटल्याचे दिसून आले. याबाबत हरिश्‍चंद्र पांडुरंग भोसले यांनी फिर्यादीनंतर मोहोळ पोलिसांनी संबंधित ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नागनाथ निंबाळे करत आहेत.