Mon, Aug 19, 2019 10:12होमपेज › Solapur › मोहोळजवळ अपघातात 3 ठार

मोहोळजवळ अपघातात 3 ठार

Published On: Dec 18 2017 2:44AM | Last Updated: Dec 17 2017 11:46PM

बुकमार्क करा

मोहोळ ः प्रतिनिधी

उभ्या राहिलेल्या एका टँकरच्या ड्रायव्हर व क्लीनरला पिकअप व्हॅनने धडक देऊन पुढे जाऊन एका मोटारसायकललाही धडक देऊन झालेल्या दुहेरी अपघातात तिघे जण ठार झाले. हा अपघात 17 डिसेंबर रोजी रात्री उशिरा मोहोळपासून सात किलोमीटर अंतरावर हिवरे पाटीजवळ घडली. 

मोडनिंबकडून मोहोळकडे येणार्‍या (एम.एच. 13 ए. एम.8468) या पिकअपचा चालक विठ्ठल विश्‍वनाथ बंडगर (वय 37, रा. बाळे) याने बेजबाबदारपणे वाहन चालविल्याने यावली गावाजवळ उभ्या असलेल्या टँकर (क्र. एम.एच. 16 ए.वाय. 7781) या गाडीची डिझेल टाकी लीकेज झाल्याने ती दुरुस्त करण्यासाठी टाकीजवळ उभे असलेले मनोजकुमार यादव (वय 30), राजकुमार यादव (वय 25, दोघे रा. जैनपूर, उत्तर प्रदेश) या दोघांना उडवून समोरून येणार्‍या मोटारसायकल (क्र. एम.एच. 13 ए.डब्लू. 5881) वरील युवक गणेश दत्तू आखाडे (25, रा. हिवरे, ता. मोहोळ) या तिघांना जोराची धडक दिल्याने हे तिघेही अपघातात ठार झाले. याबाबतची खबर स्वतः जीपचालक विठ्ठल बंडगर यांनी दिली असून हयगयीने वाहन चालवून तिघांच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍या पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोहेकॉ अविनाश शिंदे हे करित आहेत.