Sat, Nov 17, 2018 22:39होमपेज › Solapur › संविधानाची प्रत जाळणाऱ्यांचा ज्योती क्रांती परिषदेकडून निषेध 

संविधानाची प्रत जाळणाऱ्यांचा ज्योती क्रांती परिषदेकडून निषेध 

Published On: Aug 11 2018 8:16PM | Last Updated: Aug 11 2018 8:16PMमोहोळ : प्रतिनिधी

दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा. अशी मागणी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी निवेदनाद्वारे केली. या बाततचे निवेदन मोहोळ पोलीस प्रशासनाला देण्यात आले.

भारतीय संविधानाची प्रत जाळून घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण देशवासीयांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. शनिवारी ११ ऑगस्ट रोजी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शिलवंत क्षिरसागर, उमेश कांबळे, आप्पा बनसोडे, सचिन सुरवसे, धिरज कांबळे, सुशांत बनसोडे, लक्ष्मण करे, सुशांत शिवशरण, आकीब मुजावर इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.