Mon, Apr 22, 2019 16:33होमपेज › Solapur › विठ्ठलासमोर सर्व भाविक समान : मोहन भागवत 

विठ्ठलासमोर सर्व भाविक समान : मोहन भागवत 

Published On: Jan 18 2018 12:54PM | Last Updated: Jan 18 2018 12:54PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

विठ्ठलासमोर सर्व भाविक समान असून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती भाविकांना चांगल्या सोयी, सुविधा पुरवत आहे. मंदिर समितीचे कामकाज उत्कृष्ठ असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी दिला. 

मोहन भागवत हे संत संमेलनानिमित्त पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी सकाळी  विठ्ठल रुक्मिणीचे  दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर समितीच्यावतीने त्यांचा सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी केले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, सचिन आदटराव, शकुंतला नडगिरे, हभप गहिनीनाथ औसेकर, हभप भास्करगिरी महाराज उपस्थित होते. त्यानंतर मोहन भागवत यांनी नामदेव पायरीजवळील संत चोखामेळा समधीचेही दर्शन घेतले.