Wed, Sep 19, 2018 14:36होमपेज › Solapur › मोडनिंब येथे शेतकर्‍याची आत्महत्या

मोडनिंब येथे शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Dec 09 2017 1:47AM | Last Updated: Dec 08 2017 10:25PM

बुकमार्क करा

मोडनिंब : प्रतिनिधी 

नापिकी आणि कर्जाला कंटाळून तरुण शेतकर्‍याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोडनिंब येथील पालखीमार्ग परिसरात  घडली.

सचिन बबनराव गिड्डे (वय 35) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. गिड्डे यांना 10 लाख रुपयांहून अधिक कर्ज झाले होते. त्यातच शेतात नापिकी असल्याने ते नैराश्यात होते. गुरुवारी दुपारी काही कामासाठी गावात जातो असे घरी सांगून ते घराबाहेर पडले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाही. 

शुक्रवारी पहाटे नातेवाईकांसह शेजार्‍यांनी शोध घेतला असता घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्याुच्या पश्‍चात वडील, आई, पत्नी, दोन मुले, भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.