Tue, Mar 26, 2019 22:04होमपेज › Solapur › पवार म्हणतात, 'आयला, मोदी लोकांनी छळलंय'

पवार म्हणतात, 'आयला, मोदी लोकांनी छळलंय'

Published On: Feb 17 2018 2:07PM | Last Updated: Feb 17 2018 2:28PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंजाब नॅशनल बँकेतील गैरव्यवहारचा मुख्य सूत्रधार नीरव मोदीचा संदर्भ देत, आयला मोदी लोकांनी लई छळलंय, अशी मिश्किल कोटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. वाडी कुरोली ( ता. पंढरपूर ) येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

वाचा : ‘मोदी तुमच्या नावावर 15 लाखांचे कर्ज करुन जातील’

पवार म्हणाले, 'शेतकरी कर्जमाफीत शेतकऱ्यांची सरकारने फसवणूक केली, एक महिन्यांपूर्वी बँकांना तोटा भरून काढण्यासाठी ८१ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आणि निरव मोदी ११ हजार कोटी रुपये घेऊन पळून गेले. २०१६ मध्येच पंतप्रधान कार्यालयास पत्र लिहून नीरव मोदी पळून जातील असं कळवलं होतं. तरीही अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई केली नाही. तक्रार मोदी विरुद्ध आणि राज्यकर्ते मोदीच म्हणून याकडे दुर्लक्ष झाले असावे.'

वाचा : देशाला मोदी नावाचे ग्रहण : जयंत पाटील

सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण आणि शेतकरी मेळाव्यात पवार प्रमुख म्‍हणून उपस्थिती होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार विजयसिंह मोहिते- पाटील, खासदार धनंजय महाडिक आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व आमदार यावेळी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, 'जबाबदार व्यक्तीने हा पत्रव्यवहार २०१६ मध्ये करूनही पंतप्रधान कार्यालय काही काळजी घेत नाही. हे आक्षेपार्ह आहे. भाजप सरकार मोदींना पाठीशी घालत आहे असे वाटते. २०११ मध्ये नीरव मोदींना कर्ज दिल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. मात्र, २०११ मध्ये नीरव मोदींनी बँकेत खाते उघडले आहे. लगेचच कोणतिही बँक कर्ज देत नसते. विश्वास संपादन करून नीरव मोदींनी हे कर्ज मिळवले आहे. २०१४ नंतर या सरकारने दक्षता का घेतली नाही?'

स्वामिनाथन आयोगाची स्थापना यूपीए सरकारने केली. त्यांच्या ५० टक्के शिफारशी यूपीए सरकारने लागू केल्या होत्या. सर्व राज्यांना विश्वासात घेऊन शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात शंभर  टक्के अंमलबजावणीचा विषय घेण्यासाठी चर्चा करू, अशी ग्वाही पवार यांनी दिली.