Fri, Apr 26, 2019 19:17होमपेज › Solapur › आ. पतंगराव कदम यांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन

आ. पतंगराव कदम यांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन

Published On: Mar 12 2018 10:41PM | Last Updated: Mar 12 2018 10:41PMपंढरपूर : प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांच्या  अस्थींचे आज चंद्रभागेत विधीवत विसर्जन करण्यात आले. दिवंगत आ. कदम यांचे चिरंजीव विश्‍वजीत कदम यांच्यासह कदम कुटुंबीयातील सदस्य, काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

दिवंगत आ. कदम यांच्या अस्थींचे विसर्जन चंद्रभागा नदीत करण्याकरिता त्यांच्या अस्थी सोमवारी दुपार 3 वाजण्याच्या सुमारास पंढरपुरात आणण्यात आल्या. आ. कदम यांचे पुत्र विश्‍वजीत कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांपैकी शांताराम कदम, चंद्रशेखर कदम, कुंडलिक गायकवाड, राजेंद्र जगताप आदी आले होते. 

यावेळी येथील छत्रपती शिवाजी चौकात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आ. कदम यांच्यावर प्रेम करणारे नागरिक सोलापूर जिल्हाभरातून आलेले  मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे आल्यानंतर पायी चालत अस्थी चंद्रभागेच्या वाळवंटात घेऊन जात असताना श्री. विठ्ठल मंदिरासमोर संत नामदेव पायरी येथे अस्थी कलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर  या   अस्थी  चंद्रभागेच्या वाळवंटात आणल्या गेल्या. त्याठिकाणी अस्थींचे विधीपूर्वक पूजा करून अस्थींचे कुटुंबीयांच्याहातून विसर्जन करण्यात आले.  

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील ( पानीवकर ) माजी आ. दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, रुक्मिणी विद्यापीठाचे प्रमुख विजयसिंह पवार,  विठ्ठलचे संचालक भगीरथ भालके, दादासाहेब साठे, सांगोल्याचे काँग्रेस नेते प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,  नगरसेवक महादेव भालेराव,   प्रशांत शिंदे, रुक्मिणी बँकेचे सरव्यवस्थापक अ‍ॅड. शिवाजी दरेकर, सुनंजय पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश भादुले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, काँग्रेस युवकचे माजी शहराध्यक्ष शंकर सुरवसे,  शहरउपाध्यक्ष प्रा. अशोक डोळ, काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा आशा बागल, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, अमर सूर्यवंशी, समीर कोळी  संदीप पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.