Thu, Apr 25, 2019 06:15होमपेज › Solapur › वाखरीत आमदार निधीतील सभामंडपाचे भूमिपूजन

वाखरीत आमदार निधीतील सभामंडपाचे भूमिपूजन

Published On: Dec 02 2017 10:30PM | Last Updated: Dec 02 2017 9:57PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

वाखरी (ता.पंढरपूर) येथील यल्लमा देवीच्या मंदीरासमोर आमदार निधीतून बांधण्यात येणार्‍या नियोजीत सभामंडपाचे भूमिपूजन शनिवार (दि. 2 डिसे.) रोजी आ.भारत भालके यांच्याहस्ते संपन्न झाले.


वाखरी येथील श्री. यल्लमा देवस्थान पंढरपूर तालुक्यात प्रसिद्ध असून देवीच्या मंदिरासमोर सभामंडप नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होत होती. आमदार भारत भालके यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर त्यांच्या आमदार निधीतून सभामंडपासाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.  यल्लमा देवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून शनिवारी या सभामंडपाचे भूमिपूजन आ. भालके यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी देवीचे पुजारी नारायण मनोहर पोरे यांच्याहस्ते आ.भालके यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच सौ. मथुराबाई मदने, सहकार शिरोमणीचे संचालक इब्राहिम मुजावर, माजी संचालक शिवाजी मदने, हणूमंत जालिंदर पोरे, माजी सरपंच सुरेश पोरे, माजी संचालक गंगाधर गायकवाड, लक्ष्मण गायकवाड,जोतीराम पोरे, कृष्णदेव चव्हाण, ग्रा.पं.सदस्य संग्राम गायकवाड, रामचंद्र पांढरे, पोलीस पाटील बाळासाहेब शेंडे,  तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पोपट गायकवाड आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.