Tue, Apr 23, 2019 21:51होमपेज › Solapur › आ. बबनदादांच्या वाढदिनी 1 हजार 567 जणांचे रक्तदान

आ. बबनदादांच्या वाढदिनी 1 हजार 567 जणांचे रक्तदान

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 9:50PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना कार्यस्थळावर 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 4 यावेळेत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 1 हजार 567  जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. 

रक्तदान शिबिरामध्ये कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच सभासद, शेतकर्‍यांनी रक्तदानासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एकूण 1,567 रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.एस. रणवरे यांनी दिली.

अधिक माहिती देताना आर.एस. रणवरे म्हणाले की, रक्तदान शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे संचालक व जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते कै. आ. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

या रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलनासाठी स.म. शंकरराव मोहिते-पाटील ब्लड बँक अकलूज, श्रीमान रामभाई शहा ब्लड बँक, बार्शी, मल्लिकार्जुन ब्लड बँक, हेडगेवार ब्लड बँक, सिध्देश्‍वर ब्लड बँक, सोलापूर ब्लड बँक, दमाणी ब्लड बँक, अश्‍विनी सह.ब्लड बँक,सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर, भगवंत ब्लड बँक, बार्शी, पंढरपूर ब्लड बँक, पंढरपूर, सरजूबाई बजाज ब्लड बँक पंढरपूर, संजीवनी ब्लड बँक, रेवनील ब्लड बँक, सांगोला या ब्लड बँकांच्या कर्मचार्‍यांनी उपस्थित राहून रक्त संकलन केले. 

मौजे रांझणी येथील दत्तात्रय भैरू जाधव यांनी याप्रसंगी रक्तदान करून 67 वेळा रक्तदान करण्याचा विक्रम केला.

याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील, संचालक वामनराव उबाळे, प्रभाकर कुटे, वेताळ जाधव, बाळासाहेब ढवळे, पोपट चव्हाण, बाबुराव सुर्वे, शिवाजी डोके, सुभाष नागटिळक, कार्यकारी संचालक आर.एस. रणवरे, सचिव एस.आर.यादव, वर्क्स मॅनेजर सी. एस. भोगाडे, चिफ केमिस्ट पी. एस. येलपले, लेखापाल डी. डी. लवटे, मुख्य शेतकी अधिकारी एस. पी. थिटे, मुख्य ऊस विकास अधिकारी एम. आर.भादुले, डिस्टीलरी मॅनेजर पी. व्ही. बागल, शेतकी अधिकारी एस. एस. बंडगर, परचेस ऑफिसर जे. डी. देवडकर, सिव्हिल इंजिनिअर एस. आर. शिंदे, कामगार प्रतिनिधी अनिल वीर, सुरक्षा अधिकारी जे. बी. मुटेकर हे उपस्थित होते.