होमपेज › Solapur › महाराजांना पाहताच चुकलेल्या चिमुकल्याने मारली कडकडून मिठी

महाराजांना पाहताच चुकलेल्या चिमुकल्याने मारली कडकडून मिठी

Published On: Jul 21 2018 9:30AM | Last Updated: Jul 21 2018 9:30AMकरकंब : भीमा व्यवहारे

करकंब शहरात मुक्कामी असलेल्या केदारनाथ महाराज दिंडीतील कृष्णा ज्ञानेश्वर मोटे (वय १२, रा. बोधेगाव ता. फुलंबी जि. औरंगाबाद) येथील मुलगा गर्दीत दुसऱ्याच वरकाऱ्यांसोबत गेला होता. या अनोळखी मुलाला वारकऱ्यांनी करकंब पोलिस ठाण्यात आणून सोडले. यानंतर पेलिसांनी त्याच्याकडून माहिती घेऊन गावाकडे संपर्क साधून त्याला त्याच्या पालखी प्रमुखास बोलावून घेतले. यावेळी आपल्या पालखीचे महाराज पाहताच कृष्णाने पळत जाऊन त्यांना कडकडून मिठी मारली.

वारकऱ्यांना एक रडत असलेला मुलगा दिसला. त्यांनी त्याला पोलिसांकडे देऊन  हा मुलगा हरवलेला असुन तो चुकुन आमच्या दिंडीत आला असल्याचे पो. हे. कॉ. अमित माळुंजे यांना सांगितले. करकंब पोलिस ठाण्याचे प्रमुख सपोनि उमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार सिरमा गोडसे ,पो. ना सोमनाथ गायकवाड ,पो. कॉ. रमेश फुगे यांनी त्या मुलाची प्रेमाने विचारपूस  करुन औरंगाबाद ग्रामीण पोलीस कंट्रोल रुमशी संपर्क केला. वडोदबाजार पोलीस स्टेशनला फोन केला व त्यांच्याकडुन बोधेगाव6 पोलीस पाटील यांना फोन करुन तात्काळ मुलाचे घरी पाठवून मुलाच्या आईशी संपर्क  केला. कृष्णाच्या आईने तो केदारनाथ महाराज पालखी सोबत वारीला गेल्याचे सांगून पालखी प्रमुख हभप बोरडे महाराज यांचा मोबाईल नंबर प्राप्त करून दिला.

पोहेकॉ अमित माळुंजे यांनी महाराजांना फोन करुन करकंब पोलीस ठाण्यात बोलावुन घेतले. कृष्णाने महाराजांना पाहताच त्‍यांना कडकडुन मिठी मारली. हभप बोरडे महाराजांनी करकंब पोलिसांचे आभार मानले. पोलिसातील विठ्ठल भेटल्याचा आनंद मोटे कुटुंबासह पालखीतील वारकऱ्यांना झाला.