Wed, Mar 27, 2019 03:59होमपेज › Solapur › मोहोळ येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण

मोहोळ येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण

Published On: Aug 06 2018 4:45PM | Last Updated: Aug 06 2018 4:45PMमोहोळ :  वार्ताहर 

आष्टे (ता. मोहोळ) येथील युवकाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्‍याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ९ दिवसांनंतर मोहोळ पोलिस ठाण्यात संशयीत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आष्टे येथील १७ वर्षीय मुलगी २९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सुनिल राजू काळे याच्या सोबत मोहोळ येथे बाजारला गेली होती. रात्री उशीर झाला तरी  ती मुलगी आणि सुनिल काळे हे दोघेही परत आले नाहीत. मुलीच्या आईवडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र, ती मिळून आली नाही. तेव्हापासून मुलीच्या घरातील लोक तिच्या शोधात होते. त्यानंतर सुनिल काळे हा या  मुलीस मुंबईला घेवून गेला असल्याचे एका नातेवाईकांकडून समजले.

याबाबत या मुलीच्या आईने आज मोहोळ पोलिस ठाण्यात सुनिल काळे याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार पोलिसांनी सुनिल कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे हे पुढील तपास करीत आहेत.