Wed, Mar 20, 2019 23:01होमपेज › Solapur › सोलापूर : सहकारमंत्र्यांचे घर आरक्षित जागेवर : माने

सोलापूर : सहकारमंत्र्यांचे घर आरक्षित जागेवर

Published On: Feb 20 2018 5:47PM | Last Updated: Feb 20 2018 6:20PMसोलापूर : प्रतिनिधी

आम्ही काँग्रेसजन एकत्र आलो आहोत, त्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पायाखालची वाळू सरकलीय. देशमुखांनी स्वतःचं घर आरक्षणाच्या जागेवर बाधले. तसेच बाजार समितीत गैरपद्धतीने महानाट्यासाठी एक कोटी रुपये गोळा केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 

मंगळवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल अनुद्गार काढले होते. याचा निषेध करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माने बोलत होते. 

बेताल वक्तव्य करण्यासाठी सहकारमंत्री पटाईत आहेत. अशी वक्तव्ये करुन ते चर्चेत राहतात. जे कासव आहेत त्याला सशाची अडचण आहे. दीड वर्ष झाले बाजार समितीतील व्यापारी, आडत्यांना प्रशासनाचा त्रास होतोय. त्याला जबाबदार सहकारमंत्री आहेत, असा आरोप माने यांनी यावेळी केला.

आम्ही ६० कोटीचे डिपॉझीट ठेवले होते. आमची दुकानदारी असण्याचे कारण नाही. आम्ही शेतकर्‍यांसाठी काम केले. आमच्या नेत्याच्या मुलीवर अशा पध्दतीने हल्ला करणे गैर आहे. ही आमची संस्कृती नाही. बाजार समितीतही आमचा बाप काढला होता. आज शिंदे साहेबांच्या मुलीची औलाद काढली. सहकारमंत्र्यांचे बोलणे चुकीचे आहे. विकास थांबला की अशी वक्तव्ये करुन विषयाला फाटा देण्यात सहकारमंत्री पटाईत असल्याचे माने म्‍हणाले. 

आमच्या नेत्यावर हात घालत असाल तर आम्ही खपवून घेणार नाही. मात्र, आम्ही संस्कृती सोडणार नाही. मी पण माने देशमुख असल्याचा इशारा यावेळी मानेंनी दिला. भाजपमध्ये दोन देशमुख आहेत. एक काहीच बोलत नाहीत तर दुसरे भलतेच बोलतात. त्यांनी संस्कृती पाळावी, असा सल्लाही माने यांनी दिला.