Sat, Feb 16, 2019 16:48होमपेज › Solapur › सोलापूर : 'जनहित'ची दुधाने आंघोळ; आंदोलन तीव्र करणार(Video)

सोलापूर : 'जनहित'ची दुधाने आंघोळ; आंदोलन तीव्र करणार(Video)

Published On: Jul 18 2018 7:43PM | Last Updated: Jul 18 2018 7:43PMमोहोळ : वार्ताहर

गेल्या काही दिवसापासून दुधाच्या अनुदानाचा प्रश्न राज्यभर चिघळला आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "आमच्याकडे पंधरा दिवस पुरेल इतका दुधाचा साठा आहे," असे वक्तव्य केल्याने जनहित शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. १८ जुलै रोजी मोहोळ येथील शिवाजी चौकात संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुधाने अंघोळ करून भाजप सरकारचा निषेध केला.

यावेळी बोलताना भैया देशमुख म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे विधान हे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अपमान करणारे असून बालिशपणाचे आहे. तसेच दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी रासपच्या कार्यकर्त्याच्या संरक्षणामध्ये दूध मुंबईला घेऊन जाण्याची केलेली भाषा अत्यंत लाजिरवाणी आहे. त्यामुळे रासपचे किती कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात ते आम्हाला बघायचे आहे, असे खुले आव्हान देशमुख यांनी दिले.

येत्या दोन दिवसात दुधाच्या प्रश्नाबाबत मंत्री जाणकारांनी निर्णय घेऊन दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर न केल्यास ग्रामीण भागातून एकही टँकर मुंबई कडे जाऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी जनहित शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते