Fri, Jul 19, 2019 22:27होमपेज › Solapur › सोलापूर : शेतकर्‍यांनी दूध झाडांना ओतले, भाळवणीत आंदोलनास पाठिंबा

सोलापूर : शेतकर्‍यांनी दूध झाडांना ओतले, भाळवणीत आंदोलनास पाठिंबा

Published On: Jul 16 2018 1:41PM | Last Updated: Jul 16 2018 1:41PMभाळवणी : वार्ताहर

 भाळवणी (ता.पंढरपूर) येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला दर वाढवून मिळावा यासाठी सुरू केलेल्या दूध आंदोलनास पाठिंबा देत सर्व दूध आपल्या शेतातील झाडांना ओतले. त्याचबरोबर येथील सर्व शेतकरी दुध संकलन केंद्राकडे फिरलेच नसल्याने संकलन केंद्रही बंद होती. 

सध्या शेतकऱ्यांची सर्व बाजुने शासन गळचेपी करत असल्याचे दिसून येते. एकतर शेतातील कुठल्याच पिकांना व पाले-भाजे यांना दर नाही. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दूध व्‍यवसायाकडे वळला असून त्याच्यावर तो आपल्या संसाराचा गाढा हाकत आहे. परंतु तेथेही शासनाने दूध दराबाबत शेतकऱ्यांची गळचेपी चालू आहे. एकीकडे पशुखाद्याचे वाढते दर, गुरांच्या वाढणाऱ्यां भरमसाठ किंमती, वैरणीचे दर पाहिले तर सध्या दुधाला मिळणारा दर काडीमोड आहे. त्यामुळे दूधाला योग्य दर वाढवून मिळाला पाहिजे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासून (दि.१६) बेमुदत दुध आंदोलन पुकारले आहे. खासगी दूध संस्था व मुंबईकडे दूध जाऊ दिले जाणार नाही असा इशाराही संघटनेने दिला आहे. त्यामुळे सर्व चौका चौकात पोलिस बंदोबस्त तैनात केलेला दिसून येत आहे. या दूध  आंदोलनाचे पडसात ग्रामीण भागात चांगलेच उमटले आहेत. शेतकऱ्यांनीही ठिकठिकाणी दूध रस्त्यावर ओतुन दिले आहे. काही शेतकऱ्यांनी दूध दरवाढ मिळत नाही. तोपर्यंत शेतातील फळबागांना दूध ओतण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीतील पिकांबरोबर दुधालाही दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरटेज मोडले आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीचा योग्य व लवकरात लवकर विचात दूध दरवाढीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामीण जनतेमधून आहे. पशुखाद्याचे दर व गुरांच्या वाढणाऱ्या किंमती याचा विचार करून खर्चाच्या तुलनेत दुधाला दरवाढ मिळाली पाहिजे. सध्या दुधाला मिळणारा दर हा खर्चाच्या तुलनेत काडीमोड असल्याचे दूध उत्पादक मनोज जाधव यांनी सांगितले.