Tue, Apr 23, 2019 07:36होमपेज › Solapur › शवागृह व न्यायवैद्यकशास्त्र विभाग होणार अद्ययावत

शवागृह व न्यायवैद्यकशास्त्र विभाग होणार अद्ययावत

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:01PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

मेडिकल कॉलेजमधील शवागृह आणि न्यायवैद्यकशास्त्र विभाग अद्ययावत होणार आहे. त्यासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच याच्या कामास सुरुवात होणार आहे.
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवागृहात फक्‍त  10 मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. परंतु, येथे पोस्टमार्टमसाठी येणार्‍या मृतदेहांची संख्या खूप आहे. त्यामुळे येथे मृतदेह ठेवण्याबरोबरच पोस्टमार्टम करण्यासाठी खूप अडचणी येतात. या अडचणींमुळे येथे मृतदेह अदलाबदल झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे याचे गांर्भीय लक्षात घेऊन डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडे शवागृह व न्यायवैद्यकशास्त्र विभागाला अद्ययावत करून त्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. त्याचा दोन वर्षे पाठपुरावा करण्यात आला. परिणामी याची दखल शासनाने घेतली असून त्यासाठी 4 कोटी 99 लाख 22 हजार रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीमधून इमारतीचे बांधकाम, विद्युतीकरण आदी कामकाज करण्यात येणार आहे. 

न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे नूतनीकरण ः न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. सतीन मेश्राम यांनी अडीच ते तीन वर्षांपूर्वी जागेअभावी सिव्हिलमधील जुन्या इमारतीत न्यायवैद्यकशास्त्र विभाग उभा केला. तो येथील विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी उपयोगी येत आहे. परंतु आता यासाठी निधी मिळाल्याने अद्ययावत न्यायवैद्यकशास्त्र विभाग उभे होणार आहे जे मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक आहे.