Sun, May 31, 2020 19:48होमपेज › Solapur › शहीद गोसावी स्मारकाचे लोकार्पण

शहीद गोसावी स्मारकाचे लोकार्पण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या पराक्रम आणि बलिदानाच्या आठवणींनी रोमांच उभा करीत देशभक्‍तीने भारलेल्या वातावरणात वाखरी (ता. पंढरपूर) येथील शहीद स्मारकाचे लोकार्पण बुधवार (दि.29) रोजी करण्यात आले. गोसावी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गोसावी परिवाराने राज्यभरातील शहीद जवानांच्या नातेवाईकांचाही सन्मान यावेळी केला. पुणे एनसीसीचे गु्रप कमांडर ब्रिगेडियर सुनील बोधे, आ. भारत भालके, माजी आ. सुधाकरपंत परिचारक, सैनिक कल्याण विभागाचे संचालक निवृत्त कर्नल सुहास जतकर, निवृत्त कॅप्टन सुनील गोडबोले, कर्नल अलोक गिपाणे, कर्नल विकास कोल्हे, वा.ना. उत्पात, वीरपिता मन्‍नागीर गोसावी, वीरमाता वृंदा गोसावी, वीरपत्नी उमा गोसावी आदी उपस्थित होते.

आ. भालके म्हणाले, गोसावी परिवाराकडून प्रस्ताव आल्यास कुणालच्या नावे सैनिक स्कूलसाठी प्रयत्न करू. माजी आ. सुधाकर परिचारक यांनीही कुणालच्या बलिदानाचा गौरव करताना सांपत्तीक स्थिती चांगली असूनही कुणाल यांनी देशप्रेमातून सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. गोसावी यांची प्रेरणा घेऊन अनेकजण सैन्यात दाखल होतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरपिता मुन्‍नागीर गोसावी यांनी, आभार अविनाश गोसावी यांनी मानले. सूत्रसंचालन विक्रम विस्कीटे व सतीश बुवा यांनी केले.