होमपेज › Solapur › पहिल्या दिवशी 95 अर्जांची विक्री

पहिल्या दिवशी 95 अर्जांची विक्री

Published On: May 29 2018 10:51PM | Last Updated: May 29 2018 10:40PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर  कृषी   उत्पन्‍न   बाजार  समिती  संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी जुन्या संचालकांसह नव्या काही इच्छुक नेतेमंडळींनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. पहिल्याच दिवशी  95 अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, संतोष पवार, इंद्रजित पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज नेल्याने यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत आता मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे अर्ज नेणार्‍यांच्या यादीवरून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीला राजकीयदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. जुन्या संचालकांपैकी सुरेश हसापुरे, बाळासाहेब  शेळके, सिद्धाराम चाकोते यांनी उमेदवारी अर्ज नेले असून, नवख्या इच्छुकांनीही  निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

दक्षिणचे माजी सभापती चंद्रकांत सुर्वे, सिध्दाराम हेले, उत्तर तालुक्याचे नेते जितेंद्र साठे, इंद्रजित पवार यांच्यासह अंकुश केदार, अनिलकुमार नलवडे, शांताप्पा कुंभार, उमाकांत यरवडे, आप्पासाहेब पाटील, शिवानंद चिट्टे, गणेश कांबळे, रामप्पा स्वामी, मलकप्पा कोडले, बाबुराव रामकोरे, रमशे क्षीरसागर, रावसाहेब होनमाने, दयानंद शिंदे, सुंदर पाटोळे, काशिनाथ होनराव, प्रभाकर कोरे, रमेश हसापुरे, विजयकुमार गायकवाड, शिवाजी कांबळे, शिवाप्पा धुप्पाधुळे, संजय कोते, जिजाबाई राठोड, अशोक जोकारे, आनंद मुस्तारे, संतोष पवार, उस्मान बागवान, मल्लिकार्जुन नरोळे, श्रीशैल नरोळे, इंद्रजित लांडगे, काशिनाथ कदम, सतीश हसापुरे, अभिमन्यू पवार, राजकुमार वाघमारे, सिद्राम यारगले, विश्रांत गायकवाड, विश्‍वास कुलकर्णी, दीपक नारायणकर, संतोष साठे, सोमलिंग होनमाने, जावेद पटेल, सिध्दाप्पा कोडले, समाधान गरड, जयश्री संगोळगी, विजय राठोड, बिपीन करजोळे, श्रीमंत बंडगर, मिलिंद मुळे, रावजी कापसे, श्रीशैल माळी, सुनीता रोटे, शरद नागणे, अर्जुन बनसोडे, आप्पाराव कोरे आदी 95 लोकांनी अर्ज नेले असून बुधवारपासून अर्ज स्वीकृती होणार आहे. पहिल्या दिवशी विक्री झालेल्या अर्जांची संख्या पाहता यंदाची बाजार समितीची निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. कारण मतदारसंघातील सर्व शेतकर्‍यांना बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा अधिकार यावेळी पहिल्यांदाच मिळालेला आहे.