Mon, Nov 19, 2018 06:17होमपेज › Solapur › सावकारी कर्जापायी राष्ट्रीय पुरस्‍कार चित्रपट निर्मात्याची आत्‍महत्‍या

राष्ट्रीय पुरस्‍कार चित्रपट निर्मात्याची आत्‍महत्‍या

Published On: May 20 2018 1:16PM | Last Updated: May 20 2018 2:42PMसोलापूर : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा म्होरक्या या चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांनी सोलापूरातील घरामध्ये गळफास घेऊन आत्‍महत्या केली. अवघ्या ३८ व्या वर्षी आत्महत्या केल्याने चित्रपट क्षेत्राबरोबरच अनेकांनी हळहळ व्‍यक्‍त केली. पडाल यांना आतड्याचा कर्करोग झाला होता, त्याला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवले असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसापूर्वी सोलापूरातील राहत्या घरी त्यांनी आत्‍महत्या केली. आत्‍महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून लपवून ठेवण्यात आले होते. 

कल्‍याण पडाल यांना आतड्याचा कर्करोग झाला होता, त्‍यातच त्यांना काविळही झाली होती. कल्याण पडाल यांनी म्‍होरक्‍या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाला राष्ट्रीया पारितोषिक मिळाले आहे. म्‍होरक्‍या चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. 

सावकाराकडून घेतलेले पैसे परत न करु शकल्याने आत्महत्या

उपचारासाठी सावकाराकडून घेतलेले पैसे परत न करु शकल्याने आत्महत्या करत असल्याचे पत्र त्यांनी पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्र्यांना दोन दिवसांपूर्वी लिहिल्याचेही उघडकीस आले.


कर्करोगाच्या उपचारासाठी त्यांनी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे परत न केल्याने दोन दिवसांपूर्वी सावकाराने त्यांना घरातून बाहेर नेले व डांबून मारहाण केली होती. त्यामुळे त्यांनी सोलापूर पोलिस आयुक्त आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आत्महत्या केली. या घटनेने  शहरात आणि चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.