Sat, Mar 23, 2019 16:06होमपेज › Solapur › मराठा आरक्षण : पंढरपुरात बस फोडली

मराठा आरक्षण : पंढरपुरात बस फोडली

Published On: Jul 18 2018 9:51PM | Last Updated: Jul 18 2018 9:51PMपंढरपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षण प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला येण्यापासून रोखण्याचा इशारा दिल्यानंतर पंढरपूर येथे बुधवारी सायंकाळी 8 च्या सुमारास एक बस फोडण्यात आली. या दगडफेकीत सोमनाथ आरे, समाधान मेटकरी, सत्यवान चव्हाण हे तीन प्रवाशी जखमी झाले आहेत.­

मराठा आरक्षण प्रश्नावरून १६ जुलै रोजी पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक झाली असून या बैठकीत मुख्यमंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. गनिमी काव्याने आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र तत्पुर्वी बुधवारी सायंकाळी ८ वाजल्यानंतर पंढरपूर सांगोला रोडवर दाते मंगल कार्यालयाजवळ राज्य परिवहन महामंडळाची  पंढरपूर- तपकिरी शेटफळ ही बस (एमएच - १२,  इएफ ६५१०) वर दगडफेक करून फोडण्यात आली. 

यावेळी दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय, मराठा आरक्षण सकल मराठा समाज असा मजकूर असलेली पत्रके टाकण्यात आली आहेत. घटनास्थळी पोलिस तातडीने दाखल झाले असले तरी दगडफेक करणारे कार्यकर्ते पसार झाले आहेत.