Sun, May 26, 2019 13:18होमपेज › Solapur › सोलापूर : वेळापूर १०० टक्के बंद

सोलापूर : वेळापूर १०० टक्के बंद

Published On: Jul 25 2018 11:08AM | Last Updated: Jul 25 2018 11:08AMवेळापूर (सोलापूर) : प्रतिनिधी

मराठा समाज आरक्षणासाठी बलिदान देणारे कै.काकासाहेब शिंदे-पाटील यांना वेळापुरात श्रद्धाजली वाहून वेळापुरात आंदोन सुरु करण्यात आले.

मराठा समाजाच्या वतीने आज दि.२५ सोलापूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला  वेळापुरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असुन शहरातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले. तर अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. 

मराठा समाजाला शासनाने आरक्षण जाहीर करावे यासह इतर  मागण्यासाठी आज दिवसभर वेळापुरात बंदचे अवाहन करण्यात आले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतळ्याजवळ सर्व मराठा समाज एकत्रित आला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान दिलेले काकासाहेब शिंदे-पाटील यांना श्रद्धांजली वाहून बस स्थानकापर्यत शांततेत  निषेध  रॅली काढण्यात आली.