पंढरपूर : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात तीव्र आंदोलने होत आहेत. आठवडा झाला तरी आंदोलनाची धार कमी झेलेली नाही. आज सोलापूरात सोलापूर - पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे. तसेच पंढरपुरतही तहसील कार्यालयाला टाळे ठोकूण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर तहसील कार्यालयास टाळे ठोकण्यात आल्यामुळे सुमारे पाऊण तास कामकाज बंद होते. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मोहन अनपट, नितीन बागल, समाधान फाटे, सुरेश देठे, सज्जन पुरी, सुनील पाटील, ज्ञानेश्वर जवळेकर, संजय जगताप, रणजित जगताप इत्यादी कार्यकर्त्याना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले आहे.