Thu, Jun 20, 2019 01:47होमपेज › Solapur › मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेला सोलापूर बंद स्थगित (Video)

मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेला सोलापूर बंद स्थगित (Video)

Published On: Jul 30 2018 11:45AM | Last Updated: Jul 30 2018 4:42PMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेला सोलापूर बंद स्थगित करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. बंदला स्‍थगिती दिली असली तरी, यापुढे हे आंदोलन उग्र करण्यात येणार असल्‍याचेही यावेळी स्‍पष्‍ट करण्यात आले. 

पत्रकार परिषदेत बोलातना समन्वयकांनी बंदमध्ये सहभागी झालेल्‍या संस्‍था आणि संघटनांचे आभार मानले. तसेच १ ऑगस्‍ट रोजी जेलभरो आंदोलनात सहभागी होणार असल्‍याचे सांगितले. बंदमुळे शहवासियांची गैरसोय झाल्‍याबद्दल समन्वयकांनी दिलगीरीही व्यक्‍त केली. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हा बंदच्या धर्तीवर मोहोळ शहर व तालुक्यात आंदोलक आक्रमक झाले. सोमवारी ३० जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल दोन तास सोलापूर पुणे महामार्ग रोखून धरत रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी टायर पेटवून रस्त्यावर फेकले. मात्र मोहोळ शहर व तालुक्यातील व्यापारी आणि नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शहराची बाजारपेठ खुली ठेवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासमोर मोहोळ शहराने एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

सोमवारी ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता मोहोळ येथील उड्डाण पुलावर रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी विविध राजकीय पक्षांतील मराठा समाजाचे पदाधिकारी पक्षीय भेदभाव विसरून एकत्र आले होते. तसेच विविध जातीधर्माच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. काही आंदोलकांनी बस स्थानक परिसर, पंढरपूर रोडवरील न्यायालय परिसर, कुरूल रोड चौक,  मोहोळ नगरपरिषद कार्यालय इत्यादी ठिकाणी टायर पेटवून दिले. त्यामुळे संपुर्ण शहरात धुराचे लोळ पसरले होते. यावेळी आंदोलकांनी भाजप सरकारच्या विरोधात तुफान घोषणाबाजी करुत मोहोळ शहर परिसर दणाणून सोडला.

आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हा बंद असला तरी मोहोळ शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोहोळ शहर बंद ठेवले नाही. त्यांच्या या निर्णयामुळे शहरातील व्यापारी व नागरिकांची होणारी गैरसोय टळली. मराठा क्रांती मोर्चाच्या या सकारात्मक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल सर्व क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.

याप्रसंगी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोहोळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विक्रांत बोधे, सपोनि डॉ. नितीन थेटे, सपोनि भोसले, सपोनि सोनकांबळे, पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड, पोलिस उपनिरीक्षक मुजावर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे आंदोलनाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

 

सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी सोलापूर बंदची हाक दिली. याला शहरातील व्यापारी वर्गासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला. त्यानुसार आज सकाळपासूनच शहरात आंदोलनाला सुरुवात झाली. पंढरपूर, मोहोळसह जिल्‍ह्यातील विविध ठिकाणी आंदोलनाचा जोर असून पुणे-सोलापूर महामार्ग तसेच पुणे-पंढरपूर मार्ग आंदोलकांनी रोखत रस्‍त्यावर टायर जाळले. 

सोलापुरात आंदोलकांनी जेल भरो आंदोलन केले. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला तर काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेकही झाली. पोलिस उपायुक्‍तांच्या गाडीची तोडफोड झाली. आंदोलनाला हिंसक रुप लागल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. 

या आंदोलनादरम्यान शिवाजी चौकातून आंदोलक हटण्यास तयार नसल्याने, तसेच पोलिसांनी विनंती करुनही नेते अटक करुन घेण्यास तयार नसल्याने अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला.  पोलिसांनी लाठीजार्च केल्याने जमाव अवघ्या दहा पंधरा सेकंदात पांगला. राज्यभरातील इतर मोर्चांना लागलेले हिंसक वळण लक्षात घेता सोलापुरात चोख पोलिस बंदोबस्त होता. दरम्यान, शिवाजी चौकाच्या चारही बाजूच्या रस्त्यावर गटागटाने कार्यकर्ते जमले आणि त्यांनी लांबून घोषणा बाजी सुरु केली. त्यामुळे पोलिस आणि कार्यकर्ते यंच्यात धुमश्चक्री सुरु झाली. 

शहरात काँबिंग ऑपरेशन सुरु

पोलिसांनी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर काँबिंग ऑपरेशन सुरु केले असून घरात घुसून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत २०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. सोलापुरात मराठा आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे. शहरातून पोलिसांचा मार्च सुरू असल्याने तसेच फटके मारून पोलिस आंदोलकांना ताब्यात घेत असल्याने शहरात रस्‍त्यांवर सामसूम आहे. तर एसटी स्‍थानकाच्या परिसरात अघोषित संचारबंदीचे चित्र आहे. 

आंदोलकांचा गनिमीकावा

शहर बंद आंदोलनाला हिंसक वळण लागल्यावर पोलिसांनी काँबिंग ऑपरेशम सुरु करुन अनेकांची धरपकड सुरु केली. त्यानंतर आंदोलकांनी गनिमीकावा आंदोलन सुरु केले आहे. पोलिस ज्या गल्लीतून पुढे गेले आहेत त्या गल्लीत जाउन टायर पेटवून देत आंदोलनाची धग वाढविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पोलिस परत येताच ते पुन्हा आग विझवत आहेत, तोपर्यंत आंदोलक दुसऱ्या गल्लीत जाऊन पुन्हा टायर पेटविण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलकांच्या संख्येसमोर पोलिसांची फौज तोकडी पडत आहे.

अपडेट : 

मोहोळ नगरपरिषदेसमोर आंदोलकांनी टायर पेटवले; घोषणाबाजी करून सरकारचा निषेध

सोलापुरात पोलिसांकडून काँबिंग ऑपरेशन सुरु

उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्‍तारोको आंदोलन

पोलिस बॉइज वेल्फेअर संघटनेकडून पोलिसांना बंदोबस्‍त काळात पाणी व नाष्‍टा देऊन सोय केली.

Image may contain: 4 people, people smiling, people standing and outdoor

सोलापूर : मराठा आंदोलनादरम्यान दगडफेक; पोलिस उपायुक्‍त पोर्णिमा चौगुले यांच्या गाडीची काच फुटली. पोलिस आक्रमक कार्यकर्त्यांची धरपकड

माेहोळमध्ये आंदोलकांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखला; टायर पेटवून रस्‍त्यावर टाकले

Image may contain: one or more people and outdoor

सोलापूर : नवी पेठ येथे कडकडीत बंद; सर्व व्यापारी दुकाने बंद

पंढरपूर : वाखरीत हजारोंच्या संख्येने मराठा समाज रस्‍त्यावर, पंढरपूर-पुणे मार्गावर रास्‍तारोको, वाहतूक ठप्‍प