Thu, Oct 17, 2019 04:21होमपेज › Solapur › सोलापूर : माळशिरस तालुक्यात मराठा आंदोलनाची वज्रमुठ

सोलापूर : माळशिरस तालुक्यात मराठा आंदोलनाची वज्रमुठ

Published On: Aug 05 2018 6:24PM | Last Updated: Aug 05 2018 6:23PMपानीव : विनोद बाबर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवार ६ ऑगस्टपासून बुधवारी ८ ऑगस्टपर्यंत माळशिरस तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून ९ ऑगस्टला पूर्ण माळशिरस तालुक्यात चक्काजाम करण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी माळशिरस येथील सकल मराठा समाज माळशिरस तालुक्‍याची बैठक सुमंगल मगंलकार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत बोलताना मराठा आंदोलन बदनाम करण्याचा डाव असून आंदोलन बदनाम होऊ देऊ नका. या आंदोलनात राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वानी उपस्थित रहावे तसेच मराठा समाजातील कुणावर अन्याय होत असेल तर संपूर्ण समाजाने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहायला हवे असे मत प्रकाश पाटील यांनी मांडले. पद्मजादेवी मोहीते-पाटील बोलताना म्हणाल्या की, समाजावर आंदोलनाची वेळ यायला नको आहे. वैफल्यग्रस्त पिडी तयार होऊ लागली असून सरकार याकडे दुर्लक्षक्ष करीत आहे. आपण आरक्षण मिळवायाचेच आहे मात्र याला कोणतेही गालबोट व लोकांना त्रास न देता आंदोलन करावे असा सल्लाही यावेळी देण्यात आला. उत्तमराव माने-शेंडगे यांनी मुक मोर्चाने सरकारला जाग येत नाही म्हणून ठोक मोर्चा सुरू केला आहे. नियोजनाप्रमाणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी  निलेश घाडगे, चंद्रकांत काळे, दत्तात्रय देशमुख, रवी पवार, श्रीनीवास कदम-पाटील, आकाश शिंदे आदी समाज बांधवांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी निनाद पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेखा मांडली. या बैठकीसाठी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आली होती.   

असे होणार आंदोलन

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गटानुसार व या अंतर्गत येणारे सर्व पंचायत समिती गणातील गावे हे आंदोलन करणार असून ६ ऑगस्ट सोमवारी नातेपुते, मांडवे, दहीगाव व माळशिरस हे गट व गण सहभागी  होणार असून मंगळवार दि. ७ ऑगस्ट रोजी वेळापूर, पिलीव, महाळुंग व बोरगाव  जिल्‍हा परिषद गट व  या अंतर्गत येणारे सर्व पंचायत समिती गणातील गावे हे आंदोलन करणार आहेत तर बुधवारी ८ ऑगस्ट समारोपच्या दिवशी संग्रमनगर, अकलूज, यशवंतनगर व निमगाव जिल्हा परिषद गट व  या सर्व गटातील पंचायत समिति गणातील सर्व गावे ठिय्या आंदोलन करणार आहेत .९ ऑगस्टला दिवसभर चक्काजाम व पुढे शासकीय कार्यालय बंद केली जाणार आहेत.