Thu, Jun 20, 2019 00:33होमपेज › Solapur › सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण, एसटी फोडली

सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण, एसटी फोडली

Published On: Jul 21 2018 12:45PM | Last Updated: Jul 21 2018 12:41PMसोलापूर : प्रतिनिधी

मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आज सोलापूरात विविध मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शिवाजी चौकाजवळ एक एसटी मुख्य मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने एसटी स्थानकाकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना मोर्चातील कार्यकर्त्यानी एसटीवर दगडफेक केली. यामध्ये एसटीचे नुकसान झाले आहे.

तुळजापूर रस्त्यावर कार्यकर्त्यानी तासभर चक्का जाम करताना रस्त्यावर बसूनच मुंडन आंदोलन केल.