Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Solapur › अकलूज येथे मराठा आरक्षणासाठी चक्‍कजाम व कडकडीत बंद

अकलूज येथे मराठा आरक्षणासाठी चक्‍कजाम व कडकडीत बंद

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 10:02PMअकलूज : वार्ताहर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने हाक दिल्यावरून अकलूजसह परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहराच्या चौफेर आंदोलकांनी चक्‍काजाम करून  नाकेबंदी केली. प्रतापसिंह चौकात चक्‍काजाम मध्ये महिलांचा मोठा सहभाग होता.

मराठा क्रांती मोर्चांने मराठा आरक्षणाचे प्रमुख मागणीसाठी आज  9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यास अकलूज शहर व परिसरात प्रचंड प्रतिसाद मिळाला.
  अगदी सकाळपासूनच अकलूज, संग्रामनगर, यशवंतनगर, माळेवाडी या परिसरातील सर्व गावांतील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. यामध्ये अगदी शाळा व पेट्रोल पंपही बंद ठेवण्यात आल्या. 
सकाळी 10 च्या सुमारास शहरातील प्रतापसिंह चौक, सराटी नीरा नदीवरील पुलाजवळ, अशोका चौक, मसूद मळा, व दुपारनंतर गांधी चौक अशा ठिकाणी हे चक्‍काजाम आंदोलन सुरू झाले.
रुग्ण सेवा व मयत वगळता कोणत्याही वाहनाला जाऊ दिले जात नव्हते.रस्त्यावर बसलेलं आंदोलकांच्या जय भवानी जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दुमदुमत होता. 

काही ठिकाणी चौकात भजनाचा तर काही ठिकाणी शाहिरीचा कार्यक्रम ठेवला होता.पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. नीरा नदीच्या पुलावरूनही कुणी उडी मारण्याचा प्रयत्न करू नये. यांसाठी ट्युब्स घेऊन पोलीस तयार ठेवले होते.