Thu, Jul 18, 2019 14:23होमपेज › Solapur › वैरागमध्ये जागरण गोंधळ घालून सरकारचा निषेध (व्हिडिओ)

वैरागमध्ये जागरण गोंधळ घालून सरकारचा निषेध (व्हिडिओ)

Published On: Aug 09 2018 6:00PM | Last Updated: Aug 09 2018 6:00PMवैराग (जि. सोलापूर) : प्रतिनिधी

मराठा समाज्याला त्वरित आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येथील छत्रपती शिवाजी चौकात सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घालून अंत्यत शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात आले. दिवसभर संपूर्ण बाजारपेठ, सर्व शैक्षणिक संकुले बंद ठेवण्यात आली होती. 

या ठिय्या आंदोलनाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज्याला आरक्षण मिळावे म्हणून सनदशीर मार्गाने विविध प्रकारे आंदोलने करण्यात आली. मात्र, सरकारला काही जाग येत नाही, त्यामुळे येथील छत्रपती शिवाजी चौकात सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घालून देवीच्या नावाने तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाऊन ठिय्या आंदोलन करण्यात आल्‍याची माहिती आंदोलकांनी दिली. 

सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. वैराग मधील सर्व शैक्षणिक संकुले, बाजारपेठा दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. शेवटी महिलांच्या हस्ते वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलनाची सांगता करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वैरागच्या विविध भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.