Wed, Jul 24, 2019 12:08होमपेज › Solapur › मराठा आरक्षणासाठी कोंडी येथे चक्काजाम

मराठा आरक्षणासाठी कोंडी येथे चक्काजाम

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 11:40PMतिर्‍हे : वार्ताहर

कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाज उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात 58 मोर्चा शांततेत काढण्यात आले. मात्र, याचा कोणताही परिणाम सरकारवर न झाल्याने शासनाच्या विरोधात मराठा समाजामध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आक्रमक झालेला असून आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यभर मोर्चे, बंद आंदोलन, रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहेत. 

कोंडी येथेही सकल मराठा समाज उत्तर सोलापूर 
तालुक्याच्यावतीने  सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम  आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी एक तास महामार्ग रोखून धरला होता. मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर न घेतल्यास  यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला.  

यावेळी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सोमनाथ राऊत, शरद पवार, तुकाराम मस्के, प्रताप चव्हाण, अमोल पाटील, सुहास भोसले, महेश सावंत, अभिजित भोसले, बालाजी डोंगरे, प्रमोद पवार, गणेश पाटील, प्रशांत भोसले तसेच  उत्तर सोलापूर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.