Wed, May 22, 2019 10:14होमपेज › Solapur › पोलिसांच्या ताब्यातील दोन कार्यकर्त्याना आमदार भालकेनी पळवले (Video) 

पोलिसांच्या ताब्यातील दोन कार्यकर्त्याना आमदार भालकेनी पळवले (Video) 

Published On: Jul 21 2018 2:29PM | Last Updated: Jul 21 2018 2:41PMपंढरपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षण प्रश्नी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 2 कार्यकर्त्याना आमदार भारत भालके यांनी अक्षरशः फिल्मी स्टाईल पळवून नेले. 10 ते 15 पोलीस हतबल होऊन पाहत राहिले आणि आमदार भालके बघता बघता पसार झाले. यामूळे पंढरपूर तालुक्यात वातावरण तापले आहे. 

पंढरपूर पोलिसांनी संभाजी ब्रिगेड चे प महाराष्ट्र अध्यक्ष किरण घाडगे आणि मराठा आरक्षण  समितीचे रामभाऊ गायकवाड यांना इंदिरा गांधी व्यापारी संकुल येथे ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतले होते आणि पोलीस ठाण्यात नेण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान ही घटना समजताच कार्यालयात असलेले आमदार भालके आपली गाडी घेऊन इंदिरा गांधी चौकात गेले आणि 10 ते 15 पोलिसांच्या गराड्यातुन दोन्ही कार्यकर्त्यांना बाहेर काढून आपल्या गाडीत बसवून नेले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र आमदार भालके यांनी त्यांना न जुमानता दोन्ही कार्यकर्त्यांना आपल्या गाडीत बसवून नेले. यावेळी पोलीस हतबल होऊन पाहत राहिले.