Tue, Nov 20, 2018 21:02होमपेज › Solapur › ठोक मोर्चाच्या समर्थनार्थ पाटोद्यात कार्यकर्त्यांचे मुंडन 

ठोक मोर्चाच्या समर्थनार्थ पाटोद्यात कार्यकर्त्यांचे मुंडन 

Published On: Jul 21 2018 2:34PM | Last Updated: Jul 21 2018 3:02PMपाटोदा : प्रतिनिधी

परळीत सुरु झालेल्या मराठा ठोक मोर्चाचे पडसाद पाटोदा तालुक्यात देखील उमटले आहेत. तहसील कार्यालयासमोर समाज बांधव शुक्रवारपासुन बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून शनिवारी मुंडण करुन शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. काही नेत्यांचा प्रतिकात्मक दशक्रिया विधीही केला. या आंदोलनात मुस्लिम समाजासह इतर समाजघटकातील लोक सहभागी झाले आहेत.