Tue, Jun 18, 2019 20:19होमपेज › Solapur › मंगळवेढ्यातील तरुण मलेशियाच्या तरुंगात

मंगळवेढ्यातील तरुण मलेशियाच्या तरुंगात

Published On: Dec 04 2017 9:49PM | Last Updated: Dec 04 2017 9:48PM

बुकमार्क करा

मंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

मंगळवेढ्यातील काही तरुणांना नोकरी लावण्याच्या अमीषाने मलेशिया येथे पाठवण्यात आले. मात्र वर्किंग व्हिसा नसल्याच्या कारणावरुन अटक करुन त्याना तुरूंगात ठाकण्यात आले आहे. याबाबत या तरुणांचे पालक ही अनभीज्ञ आहेत. यातील एजंट हा सांगलीचा असून तो सध्या फरार आहे.

वर्किंग व्हिसाची मुदत संपल्याने जिल्हातील मंगळवेढा, अक्कलकोट या तालुक्यातील तरुणांजवळ बनावट कागदपत्र असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान महाराष्ट्रातून हॉटेलमध्ये काम करण्यासाठी तरुणांना मलेशियाला पाठवण्यात आले आहे. यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यातील सांगली आणि कऱ्हाडचे एजंट फरार आहेत. या अटक झालेल्या तरुणांचे पासपोर्ट देखील या एजंटनी काढून घेतले आहेत. गेल्या २२ दिवसांपासून हे तरुण अटकेत आहेत. सध्या मंगळवेढा पोलिस स्टेशनकड़े याबबात काही अधिकृत माहिती आलेली नाही.