Tue, Nov 20, 2018 19:51



होमपेज › Solapur › मंगळवेढ्यात महिलांचा एल्गार शासनाचे घातले बारसे

मंगळवेढ्यात महिलांचा एल्गार शासनाचे घातले बारसे

Published On: Aug 05 2018 3:58PM | Last Updated: Aug 05 2018 3:58PM



मंगळवेढा : तालुका प्रतिनिधी 

मराठा समालाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्‍यभरत आंदोलने सुरू आहेत. यात आज मंगळवेढा तालुक्‍यात सकल मराठा समाज महिला भगिनींच्या वतीने राज्य सरकारचे बारसे घालुन आंदोलन करण्यात आले. या वेळी महिलांनी  उपरोधात्मक टिका करत सरकार घालवा अशी पाळणा गीत गात सरकार चा निषेध केला. 

संत दामाजी चौकात सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे या ठिकाणीच शहरातील शेकडो महिला मुली रणरागिणी यात सहभागी झाल्या होत्‍या. हातात भगवे झेंडे डोक्यावर फेटे बांधून मराठा आरक्षणाची मागणी करत कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही आरक्षण आमच्या  हक्काचं जय भवानी जय शिवाजी अशा घोषनांणी परिसर दणाणून सोडला. 

दामाजी चौकापासून ते चोखामेळा चौकापर्यंत हिच रांग पुन्हा दामाजी चौकापर्यंत असे महिला मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा महिला भगिनी सहभागी झाल्या होत्‍या.  मानवी साखळी आंदोलन करताना वाहतुकीस रहदारीस  कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली होती.