होमपेज › Solapur ›  मंगळवेढ्यातील लक्ष्मी दहिवडीत शॉर्ट सर्किट मुळे घराला आग(व्हिडिओ)

 मंगळवेढ्यातील लक्ष्मी दहिवडीत शॉर्ट सर्किट मुळे घराला आग (व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





लक्ष्मी दहिवडी : प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथिल माशिमबी इन्नुस आत्‍तार यांच्या घरातील मिटर मध्ये शॉर्ट सर्किट झाल्‍यामुळे  घराला आग लागली. या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्‍य जळून खाक झाले. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आत्‍तार यांच्या घराला लागलेल्‍या आगीमध्ये  घरातील फ्रीज, कुलर, सोपासेट, कागदपत्रे आदींसह इतर वस्तू जळल्या आहेत. या कुटुंबात सात व्यक्ती असुन, घराच्या शेजारी साप आल्‍यामुळे घरातील सर्वजण बाहेर गेले होते. दरम्‍यान यावेळी घरातुन धुर येऊ लागल्यावर घरात आग लागल्‍याचे समजले.यावेळी जमिर यांनी डेपो बंद करून आग विझवली. विद्युत प्रवाह सतत ये जा करत असल्यामुळे मिटर जवळ स्पार्किग होत असल्‍याचे कुट्रेबियांनी सांगितले.