Thu, Mar 21, 2019 15:24होमपेज › Solapur › मंगळवेढा : माजी काँग्रेस अध्यक्षासह दोघांवर खूनाचा गुन्हा

मंगळवेढा : माजी काँग्रेस अध्यक्षासह दोघांवर खूनाचा गुन्हा

Published On: Apr 26 2018 4:48PM | Last Updated: Apr 26 2018 4:48PMमंगळवेढा : प्रतिनिधी 

 फेसबुकवरील पोस्टवर केलेल्या कमेंटमुळेच मंगळवेढा येथील सचिन कलूबर्मे या तरूणाचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षांसह दोघा नगरसेवकांविरोधात खून आणि खूनाचा प्रयत्‍न केल्‍याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर मंगळवेढ्यात तणावाची स्थिती असून, गुरूवारी शहरात अघोषित बंदसारखी स्थिती दिसून आली. याबाबतची फिर्याद प्रदीप हरी पडवळे (वय 26) रा मंगळवेढा याने मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे. 

सचिन ज्ञानेश्‍वर कलूबर्मे, आनंद कुंडलिक चव्हाण, संतोष दिगंबर हजारे आणि फिर्यादी हे बुधवारी रात्री मुरलीधर चौकात संतोष पान शॉप जवळ लग्नाची मिरवणूक बघत उभे राहीले असता संशयीत आरोपी बाबासाहेब शिवाजी नाईकवाडी, पांडुरंग शिवाजी नाईकवाडी आणि प्रशांत सुभाष यादव हे तिथे आले आणि फेसबूकवर केलेल्या कमेन्टवरून झालेल्या मागील भांडणांचा राग मनात धरत पांडुरंग नाईकवाडी आणि प्रशांत यादव याने बाबासाहेब नाईकवाडी याला चिथावणी देत सचिन याच्या गळ्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून त्‍याला  ठार मारले आणि फिर्यादीस तू त्याचा मित्र आहे सतत त्याच्या सोबत असतोस म्हणून त्‍याच्याही डाव्या हातावर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतची  फिर्याद दाखल झाली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.

संशयीत दोन नगरसेवक फरार

यातील दोन आरोपी मंगळवेढा नगरपालिकेत नगरसेवक आहेत़. प्रशांत यादव आणि पांडुरंग नाईकवाडी हे दोघे नगरसेवक फरार आहेत. तर मुख्य संशयीत आरोपी बाबासाहेब नाईकवाडी हा युवक काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष आहे.