Tue, Apr 23, 2019 10:07होमपेज › Solapur › जबरी चोरीप्रकरणी अमर कमळेसह चौघांवर गुन्हा दाखल

जबरी चोरीप्रकरणी अमर कमळेसह चौघांवर गुन्हा दाखल

Published On: Dec 01 2017 11:17PM | Last Updated: Dec 01 2017 11:03PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा परिचरला दमदाटी करुन प्राचार्यांच्या कार्यालयाचे कुलूप उघडून कार्यालयातील 50 हजार रुपये किंमतीचे साहित्य जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी अमर कमळेसह चौघांविरुद्ध मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमर जवाहर कमळे (रा. भंडारकवठा, ता. दक्षिण सोलापूर), अनमोल केवटे, अन्य दोन अनोळखी व्यक्‍ती  अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत भीमाशंकर मुरग्याप्पा भांजे ( रा. जुने संतोष नगर, विजापूर रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सोमवार, 27 नोव्हेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये अमर कमळे व त्याचे साथीदार आले. त्यांनी कॉलेजमधील प्रयोगशाळा परिचर हनुमान टारपे यांना दमदाटी करुन त्यांच्याकडील चावीने प्राचार्यांचे कार्यालय उघडण्यास सांगितले.  त्यानंतर चौघांनी प्राचार्यांच्या कार्यालयात प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर, भिंतीवरील घड्याळ, कागदपत्रे असा 50 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. म्हणून मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक हिंगे तपास करीत आहेत.