Sun, Mar 24, 2019 12:27होमपेज › Solapur › कराड : मलकापूरमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

कराड : मलकापूरमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Jul 23 2018 3:09PM | Last Updated: Jul 23 2018 3:09PMकराड : प्रतिनिधी

कराड तालुक्यातील मलकापूर नगरपंचायतीच्या इमारतीमध्ये  मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात एकाने अंगावर रॉकेल ओतून कुटूंबासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सोमवार दि. 23 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

राजासाब दस्तगीर आत्तार (वय ४७) असे आत्मदहन करणाऱ्याचे नाव आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राजासाब आत्तार कुटूंबातील महिलांसह नगरपंचायत कार्यालयात आले. यावेळी त्यांच्या हातात रॉकेलचा कॅन होता. त्यामुळे नगरपंचायतीचे कर्मचारी व काही नागरिक त्यांच्या पाठीमागेच होते. आत्तारे याने थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करून जोरजोरात आरडाओरडा करून मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्यासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्याचवेळी नगरपंचायतीचे कर्मचारी व नागरिकांनी त्यांच्या हातातील रॉकेलचा कॅन व काडेपेटी काढून घेत त्याला ताब्यात घेतले. ही बाब पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत राजासाब आत्तार हा तेथून पसार झाला होता. 

दरम्यान, घडलेला प्रकार गंभीर असून संबंधिताविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी सांगितले. तर पोलिसांनी  घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.