Fri, Apr 19, 2019 12:31होमपेज › Solapur › सुभाष अनुसे आत्महत्या; पाच जणांना अटक

सुभाष अनुसे आत्महत्या; पाच जणांना अटक

Published On: Dec 14 2017 1:47AM | Last Updated: Dec 13 2017 9:32PM

बुकमार्क करा

माळशिरस : तालुका प्रतिनिधी 

मंगळवारी (दि. 12) पत्नी व दोन मुलींचा खून करून स्वत: आत्महत्या केलेल्या सुभाष अनुसे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगवी (ता. पंढरपूर) येथील पाच जणांना माळशिरस पोलिसांनी अटक केली आहे. कांतीलाल नारायण गलांडे, धनाजी जालिंदर गलांडे, बाळू भगवान गलांडे, बापू जालिंदर गलांडे, तानाजी जालिंदर गलांडे अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

 उंबरे वेळापूर  येथील सुभाष अनुसे याने सुळेवाडी ( पिलीव) येथील घाटात  पत्नी स्वाती हिला दगडाने ठेचून ठार मारले. आपल्या मुली ऋतुजा व प्रणिता या दोघींचा फास लावून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली होती.