Mon, Apr 22, 2019 12:32होमपेज › Solapur › माळशिरसमध्ये चक्काजामच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा 'रूट मार्च' (व्हिडिओ)

माळशिरसमध्ये चक्काजामच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा 'रूट मार्च' (व्हिडिओ)

Published On: Aug 08 2018 8:09PM | Last Updated: Aug 08 2018 7:40PMपानीव (जि. सोलापूर) : प्रतिनिधी

गुरुवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माळशिरसमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, अकलूज पोलिस निरीक्षक अरुण सावंत, माळशिरस पोलिस निरीक्षक विश्वम्बर गोलडे यांच्यासह पोलिस यंत्रणेने रूट मार्च काढून पोलिस यंत्रणा उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनास सज्ज असल्याचे निदर्शनास आणून दिले.

माळशिरस तालुक्यातील सकल मराठा समाजच्या वतीने गेली तीन दिवस माळशिरस येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्याच्या समारोपप्रसंगी प्रांताधिकारी शमा पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर पोलिसांनी रूट मार्च काढला.

पोलिस यंत्रणेकडून उद्या नाष्‍टा आणि  पाणी : मंगेश चव्हाण
उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सहभागी होणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून नाष्‍टा अणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आंदोलन हे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततामय मार्गाने करून पोलिस यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी केले