Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Solapur › कन्हेरमध्ये सत्तांतर, मळोली पोटनिवडणुकीत जाधवांची बाजी

ग्रा.पं. निवडणुकीत माळशिरस तालुक्यात संमिश्र निकाल

Published On: Mar 01 2018 12:53AM | Last Updated: Mar 01 2018 12:48AMमाळशिरस  :  तालुका  प्रतिनिधी 

तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिला असून कन्हेर ग्रामपंचायतीमध्ये 15 वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. तर मळोली ग्रा.पं.च्या पोटनिवडणूकीत पं.स.सदस्य रणजितसिंह जाधव यांनी आपले वर्चस्व कायम दाखवून दिले आहे.

माळशिरस तालुक्यातील   कन्हेर, देशमुखवाडी, लवंग, सवत गव्हाण या ग्र्रामपंचायतीची तसेच मळोली, महाळूंग ग्रा.पं.च्या रिक्‍त जागांची पोटनिवडणूक होती. आज या निवडणूकांचा निकाल लागला.  कन्हेर ग्रामपंचायतीमध्ये पं. स. सदस्य  गौतम माने यांची 15 वर्षांची सत्ता गेली आहे. कन्हेरसिद्ध बाबा ग्रामविकास आघाडीने वर्चस्व  मिळवले आहे.  देशमुखवाडी ग्रामपंचायतमध्ये देशमुख गटाचा सरपंच जनतेने निवडून दिला.  तर भगत गटाला बहुमत मिळाले आहे.  लवंगमध्ये भिलारे गटाची  सत्ता आली असून त्यांना 13 जागांसह सरपंच ही निवडून  आला. तसेच  सवत गव्हाणमध्ये सरपंचपदासाठी अनिल गौतम नवागिरे हे निवडून आले. तसेच मळोली ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत अर्चना रणजितसिंह जाधव या विययी झाल्या. तर महाळूंग  ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत  गोरख तुकाराम  मोहिते हे निवडून आले आहेत.  ग्रामपंचायत निहाय विजयी उमेदवार  पुढील प्रमाणे कन्हेर ग्रा.पं.-   सौ सुनंदा पोपट माने  सरपंच ( मिळालेली1940), विजयी उमेदवार  राजेंद्र वामन गोसावी,  पिंकू मधुकर बोडरे,  शिवदास दाजी सरगर, सोनल दत्तात्रय माने,   किसाबाई सदाशिव रुपनवर, विजय एकनाथ शेंडगे, मंदाबाई जगन्नाथ  शेंडग,   परशुराम  आभिमन्यू  मिसाळ,  नामदेव तुकाराम माने, गौरी दत्तात्रय  देवकते, मंगल  शंकर अर्जुन, दत्तात्रय  महादेव माने, मंगल लहू जाधव, लवंग ग्रा.पं.-  योगिता  राजेंद्र  सरवदे  सरपंच , ग्रा.पं.सदस्य  अंगद जयद्रथ  माने, मजुषा  शंकर  भिलारे,  शंकर केशव कदम,  वर्षा मारूती गायकवाड, सागर सुरेश गायकवाड, अर्चना  तानाजी भोसले, सारिका  राजकुमार कोकाटे,   दिपाली यशवंत पारसे, राणी अंकुश गायकवाड,  सिताराम  सदाशिव गायकवाड,  बिभिषण तुकाराम भोसले,  अर्चना  सुहास   दुरापे, देशमुखवाडी ग्रा.पं.- विष्णुपंत  रामचंद बनसोडे  सरपंच  ग्रा.पं.सदस्य अमरसिंह  प्रकाश धुमाळ ,  वर्षा गणेश  जगदाळे, रुपाली रमेश  सस्ते,   सपना  विजय भगत, उज्वला माणिक गाडे , दीपा सचिन जाधव,   बबन रामचंद्र  महारनवर, मुकूटराव  रामचंद्र देशमुख, तनुजा मच्छिंद्र  निकम.सवतगव्हाण ग्रा.पं.च्या सरपंचपदासह 2 जागांसाठी निवडणूक लागली होती. अनिल गौतम नवगीरे  सरपंच ( मिळालेली मते 818)  ग्रा.पं.सदस्य  अर्जुन प्रल्हाद  बंडगर,  दसमा  दत्तू  खरे, रिक्‍त जागांच्या पोटनिवडणुकीत मळोली  अर्चना रणजितसिंह  जाधव,  महाळूंग  गोरख  तुकाराम मोहिते हे विजयी झाले आहेत.